आज सायंकाळी नेव्हिगेशन सॅटेलाईटचे उड्डाण

navigation
श्रीहरिकोटा- नेव्हिगेशन सॅटेलाईट इस्रोच्या सतिश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे. पीएसएलव्ही २७ या क्षेपकाद्वारे क्षेत्रीय निर्देशक उपग्रह आयआरएनएसएस १ डी चे प्रक्षेपण काउंटडाऊन सुरू केल्याच्या ६० तासानंतर म्हणजेच आज सायंकाळी ५.१९ ला प्रक्षेपण होणार आहे. भारताने आतापर्यंत ३ नेव्हिगेशन सॅटेलाईट अवकाशात सोडलेले आहेत. या उपग्रहाचे वजन १,४२५ कि. ग्रॅ. आहे. श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रहाच्या उड्डाणाची उलटगणती सुरू झाल्यानंतर सर्व कामकाज सुरळीत सुरू असल्याचे इस्रोचे संचालक ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले आहे.

Leave a Comment