एलजीने लॉन्च केला जगातील पहिला ५के टीव्ही

lg
नवी दिल्ली- दक्षिण कोरियाई कंपनी एलजीने आज दोन गॅजेट्स लॉन्च केले असून एलजीने कर्व्ड स्मार्टफोन ६ फ्लेक्स २ सोबत जगातील पहिला ५के टीव्ही लॉन्च केला आहे. ५के रिझोल्युशन असलेला हा जगातील पहिला टीव्ही असून भारतीय बाजारात यापूर्वी फुल एचडीसह जास्तीत जास्त ४के रिझोल्युशन असलेले टीव्ही उपलब्ध होते.

५केचा अर्थ ५१२०x२१६० चे रिझोल्युशन. रिझोल्युशन जास्त असल्याने पिक्चर क्वालिटी शानदार असते. १०५ इंचाचा एलजीचा ५के टीव्हीचा स्क्रीन साइज आहे. या टीव्हीची किंमत ५९ लाख ९९ हजार ९०० रुपये आहे. टीव्हीमध्ये ७.२ चॅनल स्पीकर्स बसवलेले आहेत. टीव्हीसोबत एक मॅजिक रिमोट मिळतो. याशवाय, रनिंग टीव्ही वेब ऑपरेटींग सिस्टमने हा टीव्ही अद्ययावत आहे. टीव्हीत वेब ब्राउसिंग, लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया एक्सेससह अनेक सुविधा मिळतात.

Leave a Comment