वाराणसीसाठी रवाना झाले सोलर इंपल्स-२

solar
अहमदाबाद – बुधवारी सकाळी अहमदाबाद विमानतळावरुन इंधनाचा एक थेंबही न घेता केवळ सौर ऊर्जेवर उड्डाण करणारे जगातील पहिले ‘सोलर इंपल्स-२’ या सौर ऊर्जा विमानाने उड्डाण केले.

भारत दौ-यावर असलेल्या या विमानाचा दुसरा टप्पा वाराणसीमध्ये असून, बुधवार रात्रीपर्यंत हे विमान वाराणसीमध्ये उतरेल. जगप्रदक्षिणेसाठी निघालेले सोलार इंपल्स-२ दहा मार्चला अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. खराब हवामानामुळे या विमानाचा प्रवासाचा वेळ वाढला.

सोलार इंपल्स-२ सकाळी साडेपाचवाजात वाराणसीसाठी उड्डाण करणार होते मात्र सव्वासातच्या सुमारास विमानाने उड्डाण केले. काही कागदपत्रांच्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असल्यामुळे उड्डाणाला विलंब झाला.

Leave a Comment