
एक साधे काम करायचे आणि वर्षाला किमान ३७ लाख ६७ हजार रूपयांचे पगार पॅकेज मिळवायचे ही कल्पना स्वप्नातील वाटतीय? मग जरा जागे होऊन ऐका. हे पॅकेज प्रत्यक्षात दिले जात आहे ब्रिटनमध्ये. काम इतकचे की दिवसभर कोंबडीच्या पिलातून कोंबडा कोण आणि कोंबडी कोण हे शोधायचे. हे काम करणार्यांना चिक सेक्सर असे म्हणतात आणि पोल्टी फार्मवर या चिक सेक्सरना मोठी मागणीही आहे.
कोंबडा की कोंबडी ओळखण्यासाठी मिळवा मोठे पॅकेज
ब्रिटनमध्ये हे काम करणार्यां ची संख्या रोडावत चालली आहे आणि परिणामी तेथील पोल्टीमालक हे काम करू इच्छीणार्यांसाठी आकर्षण पॅकेजच्या घोषणा करत आहेत. ऐकायला हे काम सोपे वाटले तरी ते तितके सोपे नाही. त्यासाठी कौशल्याची गरज आहे आणि सावधानताही गरजेची आहे. कारण इतका पगार दिला जातो त्याप्रमाणे कामाची अपेक्षाही केली जाते. हे काम करणार्यांना तासात ८०० ते १२०० पिलांचे लिंग ओळखावे लागते. म्हणजे तीन सेकंदाला १. त्यामुळे या कामासाठी लोक मिळत नाहीत.
पोल्टी कौन्सिलचे सीईओ अँड्रयू लार्ज सांगतात हे काम करणार्या साठी वास्तविक ३ वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते मात्र इतका दीर्घकाळ प्रशिक्षण घेण्यास लोक तयार नसतात. प्रशिक्षणाशिवाय लिंग ठरविण्याचे कौशल्य अंगी येत नाही. सध्या या प्रकारचे काम करणारे १५० चिक सेक्सर कार्यरत आहेत मात्र गेल्या वर्षात एकही नव्या सेक्सरची नेमणूक झालेली नाही.
