केरळात महिलांसाठी आय सेफ अॅप

isafe
तिरूवनंतपुरम- जागतिक महिला दिनाची भेट म्हणून तिरूवनंतपुरम शहर पोलिसांनी महिलांसाठी स्मार्टफोन अॅप लाँच केले असून अँड्राईडवर चालणार्‍या या अॅपचे नामकरण आयसेफ असे केले गेले आहे. राज्याचे गृहमंत्री रमेश येन्नीथन यांनी या अॅपचे उद्घाटन सरकारी महिला महाविद्यालयात केले.

या अॅपमुळे कोणतीही अडचण असली तरी महिला पोलिस कंट्रोलरूमला संपर्क साधून मदत मिळवू शकणार आहेत. त्यासाठी पॅनिक बटण दिले गेले आहे. कोणत्याही संकटात युजरने हे बटण ७ सेकंदांसाठी दाबून धरायचे आहे. त्यामुळे त्या कोणत्या ठिकाणी आहेत त्याची माहिती पोलिस कंट्रोलरूमकडे पोहोचविली जाणार आहे. पोलिसांना मोबाईल आयडी नंबरही मिळणार असल्याने कंट्रोल रूम ज्या भागात युजर अडचणीत अथवा संकटात आहे त्या विभागातील जवळच्या पोलिस ठाण्याला संदेश देऊ शकणार आहे आणि पोलिसांची मदत तातडीने पोहोचू शकणार आहे. १० मार्चपासून हे अॅप कार्यान्वित होणार आहे. गुगल प्लेस्टोअरमधून ते डाऊनलोड करता येणार असून आत्तापर्यंत ५ हजार जणांनी ते डाऊनलोड केले असल्याचेही समजते.

हे अॅप लवकरच आयएसओ वरही उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment