हवे तेवढे चेपा-बिल मनाला वाटेल तितकेच द्या

serafina
मनपसंत पदार्थ खायला मिळाले आणि आपल्याला वाटेल तेवढीच रक्कम बिल म्हणून द्यावी लागली तर काय बहार होईल असे अनेकांना वाटत असेल. ही इच्छा पूर्ण करण्याची संधी आता खवय्यांनी मिळाली आहे. मात्र त्यासाठी थेट दुबई गाठावी लागेल.

येथील सेरोफिना या नव्याने सुरू झालेल्या रेस्टॉरंटने वर सांगितलेली योजना खास ग्राहकांसाठी सुरू केली आहे. यात आपल्याला जे हवे ते पदार्थ कितीही प्रमाणात खाता येणार आहेत. त्या पदार्थाची किंमत ठरविलेली नाही. तुम्हाला त्याची जेवढी किंमत द्यावीशी वाटेल तेवढी भरून पोटभर खाण्याचा आनंद येथे लुटता येणार आहे. सध्याही ऑफर केवळ ब्रेकफास्टसाठी आहे.

रेस्टॉरंटचे मालक डोमिनिक ग्रुएनिग म्हणाले की आपल्या ग्राहकांसाठी खास कांहीतरी नवे करावे म्हणून आम्ही ही ऑफर दिली आहे. त्याची बातमी गल्फ न्यूजमध्ये आल्यापासून आमची खूप प्रसिद्धी झाली आहे आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. ही ऑफर पुढेही सुरू ठेवण्याचा विचार आहे. ग्राहकांना खाण्याचा आनंद मिळतो आहेच पण आजपर्यंत कुणीही अजूनतरी पदार्थाच्या किमतीपेक्षा कमी रक्कम आम्हाला दिलेली नाही. योग्य रक्कम दिली जात आहे असा अनुभव येत आहे.

Leave a Comment