गंजलेल्या फेरारीला १३८ कोटींची बोली

ferrari
कार शौकिनांच्या हृदयात फेरारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गाडी विकत घेता नाही आली तरी नुसती पहायला मिळावी म्हणूनही कार शौकीन अगदी तरसत असतात. मात्र जुन्या गंजलेल्या फेरारीलाही प्रचंड किंमत मिळू शकते हे आता सिद्ध झाले आहे. फ्रान्समध्ये एका शेतात गंजत पडलेल्या फेरारी २५० जीटी एसडब्ल्यूबी, कॅलीफार्निया स्पायडर या गाडीने ही कमाल करून दाखविली आहे. पॅरिस मध्ये नुकत्याच झालेल्या एका लिलावात या गाडीला १३८ कोटी रूपये किंमत मिळाली. या मॉडेलच्या फक्त ३६ गाड्या सध्या अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे हे मॉडेल दुर्मिळ समजले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार महागड्या गाड्यांचा शौकीन बालियन याने या फेरारीसह अन्य अनेक किमती गाड्याही खरेदी केल्या होत्या. त्यात बुगाटी, स्पिनोसुजा, टोलबूट लागो, लॅन्सर, मासेरिटी डिलाहे, डेल्गी या गाड्याही होत्या. त्याला त्यांचे संग्रहालय बनवायचे होते. मात्र दहा वर्षांपूर्वी तो मरण पावला. त्यांच्या मुलाचाही गतवर्षी मृत्यू झाला. त्याला या किंमती गाड्यांबद्दल कांही माहितीच नव्हती. त्यानंतर या गाड्या शेतात गंजत पडल्या होत्या. हॉलीवूड अॅक्टर अॅलन डिलोनकडे ही फेरारी कांही काळ होती असेही समजते.

Leave a Comment