१७,९९९ रुपयात ४१ हजारांचा सॅमसंग गॅलक्सी एस-४

samsung
मुंबई: कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने दोन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत बाजारात आणलेल्या ‘गॅलक्सी एस-४’ या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली असून ज्यावेळी हा स्मार्टफोन बाजारात आला तेव्हा त्याची किंमत ४१ हजार ५०० रु. होती. मात्र आता याच स्मार्टफोनची किंमत सॅमसंगने कपात करून १७ हजार ९९९ एवढी केली आहे. एवढेच नाहीतर सॅमसंगने ई५ आणि ई७ या दोनही स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. आता सॅमसंगच्या ई५ या स्मार्टफोनची किंमत १८,२५० रु. झाली असून ई७ या स्मार्टफोनची किंमत २१,३०० एवढी केली आहे. या किंमती आजपासूनच लागू झाल्या आहेत.

Leave a Comment