लांबसडक केस गेले पण घर मिळाले

natasha
ब्राझीलमधील नताशा ही १२ वर्षांची बालिका. नताशा तिच्या पाच फूट लांबीच्या घनदाट केसांमुळे गावातच नाही तर देशातही माहिती झालेली मुलगी. मात्र आपला हा ठेवा कापून टाकण्याची वेळ आली तेव्हा साहजिकच नताशाला अतिशय दुःख झाले. पण वाईटातून चांगले असे की या केसांच्या बदल्यात तिला स्वतःचे घर विकत घेता आले. गरीब घरातील नताशाला आता स्वतःच्या मालकीच्या घरात स्वतंत्र खोलीचाही उपभोग घेता येतोय शिवाय तिचे आईवडीलही खूप आनंदात आहेत.

नताशाच्या या लांबसडक घनदाट केसांसाठी तिला ९ हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ४ लाख रूपये मिळाले. त्यातून तिला घर विकत घेता आले. नताशा सांगते, इतके दिवस सांभाळलेला हा ठेवा कापून टाकताना रडू येणे स्वाभाविक होते मात्र त्याच्या बदल्यात मला जे मिळाले ते अधिक महत्त्वाचे आहे. केस पुन्हा वाढू शकतात. मला केस कापल्याचे आता फार दुःख वाटत नाही. कारण अनेक कटकटींपासून मला मुक्ती मिळाली आहे. दर आठवड्याला हे केस धुवायचे म्हणजे खूप शांपू लागायचाच पण चार तास वेळ वाया जायचा. आता मी बीचवर अन्य मुलींप्रमाणे स्नानाचा आनंद उपभोगू शकते. उन्हाळ्यात गरम होत असतानाही केस पंख्यात अडकतील म्हणून पंखा लावता येत नसे आता ती भीती राहिली नाही. कांही तरी मिळविण्यासाठी कांही तरी गमवावे लागते तसेच हे.

Leave a Comment