आता अॅपलची ही कार !

apple
न्यूयॉर्क : आपल्या खिशात अॅपलचा मोबाईल असने ही सध्या गर्वाची बाब मानली जाते. याच अॅपलने मोबाईल जगतात आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर इलेक्ट्रिकवर चालणारी अॅपलची ‘टायटन’ कार लवकरच बाजारात येते आहे. ही कार म्हणजे एकप्रकारे सॉफ्टवेअर गेमच असेल. मात्र, ही कार लगेच तुम्हाला बुक करता येणार नाही.

खास कार डिझायनर्स आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ज्ञ अॅपलने या प्रकल्पासाठी कामाला लावले आहे. अॅपलच्या कारची अनेकांना प्रतीक्षा आहे. अॅपल मात्र, अत्यंत सावधपणे या प्रकल्पाबाबत पावले उचलत आहे.

दरम्यान, ‘गूगल’ने ही कार तयार केली असून ही कार स्वयंचलित असणार आहे. इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ‘गूगल’ने सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवण्यात यश मिळवले आहे. येत्या काही दिवसांत या कारचे परीक्षण पार पडेल आणि नवीन वर्षात उत्तर कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर ही कार पाहायला मिळेल, अशी आशा या टीमने व्यक्त केली आहे. बिना स्टिअरिंग ही कार स्वयंचलित पद्धतीने रस्त्यावर दिसेल.

Leave a Comment