शिमग्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्या

kokan-relway
रत्नागिरी – खास होळी स्पेशल रेल्वे शिमग्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहेत. मुंबई- करमाळी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

५ आणि ७ मार्च रोजी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-करमाळी ही विशेष रेल्वे धावेल. सकाळी ५.१५ वाजता सीएसटीहून ही गाडी सुटेल. त्याचदिवशी सायंकाळी ४.३० वाजता ती करमाळी येथे पोहोचेल. करमाळी येथून ती सकाळी ७ वाजता सुटून सीएसटीला सायंकाळी ५.५० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम असे थांबे देण्यात आले आहेत.

याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार आहे. पहाटे १२.४५ वाजता एलटीटीवरून ही गाडी सुटेल. मडगांवहून ती दुपारी ३.३० वाजता सुटून दुस-या दिवशी पहाटे ३.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम असे थांबे राहणार आहेत. या गाड्यांसाठी आरक्षणाची प्रक्रिया शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment