सॅमसंगचा गॅलक्सी ए७ लाँच

samsung
मुंबई : भारतात नुकताच कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी ए७ लाँच केला असून याची किंमत ३०,४९९ रु. निश्चित करण्यात आली आहे. सध्या तरी हा स्मार्टफोन कंपनीच्या ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम असा हा ए७ हा स्मार्टफोन फोन असून त्याची जाडी ६.३ मिमी एवढी आहे. त्याचा डिस्पले ५ इंच असून पिक्सल रेझ्युलेशन १०८० x १९२० असून ६४ बिट ऑक्टोकोअर क्वॉल कॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आहे. याची इंटरनल मेमरी १६ जीबी असून ६४ जीबीपर्यत मेमरी क्षमता वाढविता येऊ शकते. हा स्मार्टफोन ४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. वाय-फाय, ४जी जीपीएस, एनएफसी यासारख्या सुविधाही यात आहेत. २६०० mAh एवढी त्याची बॅटरी क्षमता आहे.

१३ मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरासह ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही आहे. सॅमसंगने या कॅमेऱ्यामध्ये खास वेगळे फीचर आणले आहेत. वाइल्ड सेल्फी, रिअर कॅम सेल्फी ब्यूटी फेस यासाऱखे नवनवीन फीचर आहेत. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड, चेंज थीम, प्रायव्हेट मोड आणि मल्टी स्क्रीन यासरखे फीचर यात आहेत. अदयाप तरी फक्त पांढऱ्या रंगामध्येच हा स्मार्टफोन उपलब्ध असून भारतात लवकरच हा स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगामध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment