विश्वाच्या निर्मितीवेळी महाविस्फोट झाल्याचा सिद्धांत खरा नाही

earth
वॉशिंग्टन : काही भौतिकशास्त्रज्ञांनी विश्वाच्या निर्मितीवेळी महाविस्फोट झाल्याचा सिद्धांत खरा नाही तसे काही झालेच नव्हते, विश्वाला सुरुवात व अंतच नाही असे म्हटले असून त्यात भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा समावेश आहे. महाविस्फोट सिद्धांताला छेद देणारा हा नवीन सिद्धांत कृष्णद्रव्य व कृष्णऊर्जा यांचा विचार करून यात पुंज भौतिकीचे नियम लावून या सिद्धांताची तपासणी करण्यात आली आहे.

विश्वाची उत्पत्ती १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली व त्यावेळी एका एकल बिंदूत सगळे सामावलेले होते. महाविस्फोटानंतर विश्वाची निर्मिती सुरू झाली. महाविस्फोट सिद्धांताप्रमाणे एकलबिंदूतून विश्वाची निर्मिती सुरू झाली असे मानले तरी आधी व नंतर काय घडले याचे स्पष्टीकरण फक्त गणिताच्या माध्यमातून करता येते. ईजिप्तच्या बेनहा विद्यापीठाचे अहमद फराग अली व कॅनडातील लेथब्रिज विद्यापीठाचे सौर्या दास यांनी म्हटले आहे की, महाविस्फोट एकलतेचे कोडे आम्ही नवीन प्रारूपानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला असून त्यात विश्वाला सुरुवात व शेवट नाही.

Leave a Comment