यंदा व्हॅलेंटाईन डे ऑनलाईन शॉपिंग २२ हजार कोटींवर

valentine
यंदाच्या व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने आपल्या जीवलगाला भेट वस्तू देण्यासाठी ऑनलाईन खरेदी करणार्‍यांची संख्या लक्षणीय वाढली असून यंदा २२ हजार कोटींची ऑनलाईन खरेदी ग्राहक करतील असा अंदाज असोचेमने वर्तविला आहे. यंदा ऑनलाईन ग्राहक कार्ड, फुले, चॉकलेटस, महागडे दागिने, गॅजेटस, खेळणी अशा वस्तूंच्या खरेदीवरच प्रामुख्याने खर्च करतील असाही अंदाज वर्तविला गेला आहे.

असोचेमचे महासचिव डी.एस.रावत म्हणाले असोचेमने ५२ टक्के ऑनलाईन खरेदीदारांचे या संदर्भात सर्वेक्षण केले त्यात ५० टक्के स्मार्टफोन धारकांचे प्रमाण होते तर टॅब्लेटसारख्या गॅजेटचा वापर ऑनलाईन खरेदी करणार्यां ची टक्केवारी १८ होती. गेली कांही वर्षे व्हेलेंटाईन डे गिफ्ट खरेदीचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. यंदाही ३३ टक्के ग्राहक ऑनलाईन खरेदीस प्राधान्य देतील असे दिसून आले आहे. असोचेमने ६०० संघटीत रिटेलर्स आणि ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचेही विश्लेषण केले आहे.

यामध्ये असे आढळून आले की ऑनलाईन खरेदीत विविध स्वरूपात दिले जाणारे डिस्काऊंट, खरेदीसाठी वस्तूंची प्रचंड मोठी रेंज, घरबसल्या करता येणारी खरेदी, मालाची घरपोच डिलिव्हरी आणि चोवीस तासात कधीही खरेदी करण्याची सोय, उत्पादनांच्या तुलनेची सुविधा यामुळे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. १८ ते २४ वयोगटातील ग्राहकांसाठी व्हेलेंटाईन डेला अजूनही चॉकलेट आणि फुले देण्याचे प्रमाण अधिक आहे तर पंचवीशीपुढील ग्राहक महागड्या गिफ्टना प्राधान्य देताना दिसत आहेत.

असोचेमच्या सर्वेक्षणात असेही आढळले की २०१४ सालात ४ कोटी ग्राहकांनी कांही ना कांही ऑनलाईन खरेदी केली आहे. हेच प्रमाण या वर्षात ६ कोटी ५० लाखांचा टप्पा गाठेल असेही संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment