ब्रिटनमध्ये तयार होत आहे ड्रायव्हरलेस कार !

driverless
लंडन : तुम्हाला जर ड्राययव्हिंग येत नसेल तरीही तुम्ही कार चालवू शकणार आहात. कारण आता लवकरच ड्रायव्हरलेस कार रस्त्यांवर धावणार आहेत. ब्रिटनमध्ये ड्रायव्हरलेस कारची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. ब्रिटनने ड्रायव्हरलेस कार्सच्या टेस्टसाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे कोट्यवधी पौंड एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प असलेल्या ड्रायव्हरलेस कार्स लवकरच रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व लंडनमधील रस्त्यांवर या ड्रायव्हरलेस कार्सची टेस्ट केली जाणार आहे.

सध्या चार ड्रायव्हरलेस कार्सची टेस्टिंग केली जाणार आहे. त्यामुळे ड्रायव्हरलेस कार्स तंत्रज्ञानाच्या दिशेने हे पहिले पाऊल असणार आहे, असे परिवहनमंत्री क्लेअरल पेरी यांनी सांगितले. ड्रायव्हरलेस कारमुळे रोड सेफ्टी वाढणार आहे. सध्या ९३ टक्के अपघात हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे ड्रायव्हरलेस कारचे महत्त्व वाढणार आहे, असे ड्रायव्हरलेस कार तयार करणा-या टीममधील प्रतिनिधी सांगतात.

या ड्रायव्हरलेस कार्सचा वेग ताशी २४ कि. मी. असणार आहे. ड्रायव्हरलेस कार्सची टेस्ट यशस्वी झाल्यास ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे. शिवाय मिलिटिरीसाठी खास ड्रायव्हरलेस कार्सही मॉडिफाय केल्या आहेत. मात्र ब्रिटन-मधील लोक ड्रायव्हरलेस कार्सबाबत साशंक आहेत, असे काही सव्र्हेक्षणातून समोर आले आहे.

दरम्यान, रस्ते वाहतुकीचे जे काही नियम असतील ते ड्रायव्हरलेस कारलाही लागू पडतील. २०१७ पर्यंत ड्रायव्हरलेस कार्स ब्रिटनच्या रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे.

Leave a Comment