मोदींच्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थीही होणार सहभागी

modi
मुंबई: यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून अनुभव शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा विचार असल्याचे नमूद केले असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आलेले अनुभव ‘मन की बात’मध्ये सांगितल्यास इतर विद्यार्थांनाही त्याचा फायदा होईल असे देखील मोदींनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि शिक्षक यांनाही अनुभव कथन करण्याचे मोदींनी सुचवले आहे. अनुभव कथन करण्यासाठी मोदींनी वेबसाईटची लिंकही ट्वीटमध्ये जोडली आहे.

ही आहे सहभागी होण्यासाठीची लिंक http://mygov.in/

Leave a Comment