मोबाईलधारकांची संख्या ९७ कोटी पार

mobile
नवी दिल्ली – ९७ कोटींवर भारतातल्या मोबाईलधारकांची संख्या पोहोचली असून दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (ट्राय) ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे. देशातील दूरध्वनी घनतेचे प्रमाण ७७.५८ टक्क्यावर गेले आहे.

नोव्हेंबर २०१४मध्ये देशात ९६४.२० दशलक्ष ग्राहक होते ते डिसेंबरमध्ये हेच प्रमाण ९७०.९७ लाखांवर गेले आहे. यातील मोबाईलधारकांची संख्या ९४.३९ कोटी आहे. त्यापैकी ८३.३ कोटी ग्राहक हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. भारती एअरटेलमध्ये २१.७२ कोटी, वोडाफोनकडे १७.८६ कोटी, आयडिया १५.०५ कोटी, रिलायन्सकडे १०.६२ कोटी, बीएसएनएल ८.१३ कोटी, एअरसेल ७.८६ कोटी, टाटा टेलीसव्‍‌र्हिसेसकडे ६.६१ कोटी, युनिनॉर ४.३६ कोटी ग्राहक आहेत. सरकारी कंपनी बीएसएनएलने डिसेंबरमध्ये १३ लाख, सिस्टेमा श्यामने ६८,११०, लूपने ७ लाख ग्राहक गमावले आहेत. ३५ लाख ग्राहकांनी कंपनी बदलण्यासाठी अर्ज दिला आहे.

Leave a Comment