मोबाईल इंटरनेटचे दर कमी होण्याची शक्यता

mobile-internet
मुंबई : मोबाईल फोनवरील इंटरनेटचे दर देशात ४ जी इंटरनेट सेवा लॉन्च झाल्यानंतर कमी होणार असून इंटरनेटचा स्पीड देखील वाढवला जाणार असल्यामुळे मोबाईल ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी इंटरनेट कंपन्या दर कमी करण्याची ऑफर देण्याची शक्यता आहे.

मोबाईल इंटरनेटचे दर काही टेलिकॉम कंपन्या आतापासूनच कमी करताना दिसत असून टेलिकॉम सेवा देणाऱ्या आयडिया कंपनीने दर कमी करुन मोठ्या संख्येत ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहे.

देशात आजमितीस एकूण मोबाईल धारकांपैकी ८५ टक्के लोक मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत नसल्यामुळे मोबाईलवर इंटरनेट न वापरणाऱ्या युजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी प्रवृत्त करणे, हे टेलिकॉम कंपन्यांपुढील आव्हान असल्यामुळेच इंटरनेट दर कमी करण्याचे प्रयत्न सर्वच टेलिकॉम कंपन्या करत आहेत.

Leave a Comment