
बीजिंग : आजच्या घडीला अन्न, वस्त्र आणि निवारा याचबरोबर इंटरनेट देखील एक अविभाज्य घटक बनला असून सध्या लहान मुलांपासून वयोवृद्ध देखील इंटरनेटचा वापर सर्रासपणे करताना दिसतो. आणि त्यातकाहीजण असे असतात की त्यांना इंटरनेटपासून फार वेळ दूर राहता येत नाही. मात्र याच इंटरनेट सर्फिंगच्या सवयीमुळे चीनमधील एका युवकाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. इंटरनेट वापराची सवय सुटावी म्हणून एका युवकाने स्वत:ला शिक्षा दिली आहे. युवकाने त्याचा उजवा हाताचा पंजा कापला. चीनमधील जियांगसू प्रांतातील नानटोंग शहरात ही घटना घडली. वांग (वय-१९) असे या युवकाचे नाव आहे.
इंटरनेटची सवय सोडण्यासाठी कापला स्वत:चा हात !
जियांगसू प्रांतातील एका शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. विद्याथ्र्याला इंटरनेटशिवाय राहता येत नसल्याने त्याला त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे रागाच्या भरात त्या विद्याथ्र्याने चक्क त्याचा हातच कापून टाकला. सध्या या विद्याथ्र्यावर उपचार सुरू आहेत. विद्याथ्र्याच्या हातावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय त्याच्या हातावर तातडीने सर्जरीही करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, विद्याथ्र्याच्या हात पुन्हा जोडला जाऊ शकतो की नाही, यावर अद्याप काहीच सांगता येत नाही.
जियांगसू टीव्हीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, वांग याने चाकूने स्वत:चा उजवा हात कापला. एवढेच नाही तर आईला चिठ्ठी लिहिली. त्यात आपण स्वत:चा हात कापल्याचा लिहिले आणि टॅक्सी बोलवून रुग्णालयात दाखल झाला. आई मी थोड्या दिवसांसाठी रुग्णालयात जात आहे, असे वांग याने त्याच्या आईसाठी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले होते. वांग खूप हुशार आहे. तो असे पाऊल उचलेले, असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे.
ही घटना चीनमधील असली तरी इंटरनेट सर्फिंग आणि त्यातही विशेषत : सोशल नेटवक्र्सचे व्यसन हे आजच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे ही घटना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दरम्यान, एका अहवालानुसार, आशियातील देशांपैकी एकट्या चीनमध्ये ६४९० लाख इंटरनेट यूजर्स आहेत. त्यापैकी २४० लाख लोक वेब अॅडिक्ट आहेत.
