२ महिन्यांत अमेरिकेत अडीच लाख रोजगार निर्मिती

jobs
वॉशिंग्टन : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली असून १९९० मध्ये आलेल्या रोजगारांच्या लाटेपेक्षाही अधिक गतीने रोजगार निर्माण होत आहे. गेली अनेक वर्षे फिक्या पडलेल्या रोजगारनिर्मितीला गती मिळत असून, लाखो अमेरिकी नागरिकांना चांगले पगारही मिळण्याच्या संधी आहेत. उद्योजकांनी जानेवारी महिन्यात दोन लाख ५७ हजार रोजगार निर्माण केले आहेत. पण यापेक्षा नोव्हेंबर- डिसेंबर १४ मध्ये एक लाख ४७ हजार रोजगार निर्माण झालेले आहेत.

नव्या दहा लाख कामगारांना एक नोव्हेंबरपासून उद्योजकांनी नोकरी दिली आहे. १९९७ पासून विचार केला तर तीन महिन्यांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याचीही पहिली वेळ आहे. १९९९ नंतर सर्वाधिक रोजगारांची निर्मिती २०१४ मध्ये झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कामगार मंत्रालायने दिली आहे. अध्यक्ष बराक ओबामा सरकारच्या आर्थिक नीतिवर होत असलेल्या टीकेला कदाचित आगामी निवडणुकीत फार महत्त्व राहणार नाही. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन यांना व्हाइट हाऊस आपल्या ताब्यात ठेवणे सोयीचे होईल.

Leave a Comment