भराडी देवीच्या जत्रेसाठी जादा रेल्वे

anganewadi
मुंबई – रेल्वे प्रशासनातर्फे आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी सावंतवाडी-मुंबई-सावंतवाडी अशी गाडी कोकण रेल्वेतर्फे सुरु करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ००११६ सावंतवाडी-मुंबई आणि गाडी क्रमांक ००११५ मुंबई-सीएसटी-सावंतवाडी या मार्गावर धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सावंतवाडीसाठीची विशेष गाडी ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत धावणार आहे. सदर गाडी सावंतवाडीवरून पहाटे ४.३० मिनिटांनी सुटणार आहे आणि मुंबईत दुपारी १.२० मिनिटांनी पोहचणार आहे. तर मुंबईहून सावंतवाडीसाठी दुपारी २.२० वाजता ही गाडी सुटणार आहे आणि रात्री १२.३० वाजता सावंतवाडीत पोहोचणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे थांबे असलेली ही गाडी १३ डब्यांची असणार आहे.

Leave a Comment