अॅन्ड्रॉईड टॅब्लेटसोबत मोफत मिळणार मायक्रोसॉफ्ट ऑफिस

ms-office
सिएटल- आपले लोकप्रिय ‘वर्ड’, ‘एक्सेल’ आणि ‘पॉवरपॉइंट’ अॅप्लिकेशन अॅेन्ड्रॉईड टॅब्लेटवर सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील जगातील बलाढय़ कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने मोफत दिली असून याचा मोठा फायदा जगातील कोटय़वधी ग्राहकांना होणार आहे. त्याचबरोबर ‘आऊटलूक’ ई-मेल प्रोग्राम आता आयफोन आणि आयपॅडमध्ये देऊ केला आहे.

मायक्रोसॉफ्ट अॅ पल आणि गुगलच्या स्पर्धेत मागे पडत असल्याने मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय उत्पादन अॅेन्ड्रॉईडवर देण्याचे ठरवले आहे. अॅ पलच्या लोकप्रिय आयओएस आणि गुगलच्या अॅयन्ड्रॉईडवर मायक्रोसॉफ्टने ‘ऑफिस ३६५’ उपलब्ध केले आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा ७ डॉलर्स मोजावे लागणार आहेत.

गुगल प्लेअॅवप स्टोअरवरून हे ‘ऑफिस’ अॅिप ग्राहकांना डाऊनलोड करून घेता येऊ शकेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीची वर्ड, एक्सेल व पॉवरपॉइंट ही सर्वाधिक खपाची अॅपप्लिकेशन्स आहेत. तसेच विंडो १० बरोबरच अत्यंत सोपी ऑफिसअॅ्प सादर करण्याचे मायक्रोसॉफ्टने ठरवले आहे.

Leave a Comment