इबोलाच्या लशीची माणसावर यशस्वी चाचणी

vaccine
लंडन : इबोला लसीची पहिली चाचणी ऑक्सफर्ड विद्यापीठात यशस्वी झाली आहे. लसीत सुरक्षितता आणि रोग प्रतिकार शक्तीला चांगला प्रतिसाद दिला आहे. इबोला लसीचे संशोधन करणा-या पथकाचे नेतृत्व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर संस्थेचे प्राध्या पक अँड्रीयन हिल करत आहे. इबोला लसीने चांगला प्रतिसाद दिला. अपेक्षापेक्षा अधिक सुरक्षित आहे, असे प्राध्या‍पक हिल यांनी सांगितले.

इबोला लसीचा वापर पश्चिम आफ्रिकेत केला जाऊ शकतो. लस अमेरिकेची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्द आणि औषध कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लिन विकसित केले आहे. चाचणी करिता लसीचे डोस मोठ्याप्रमाणावर लायबेरियात पाठवण्याीत आले आहे. लसीचा प्रयोग चिम्पांझीवर करण्याोत येत असून चाचणीत प्रतिकार शक्ती निर्माण करत असल्याचे दिसत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment