२०० वर्षांपूर्वीची बौद्ध भिख्खूची ‘ममी’ सापडली मंगोलियात !

mummy
नवी दिल्ली : एका बौद्ध भिख्खूची ‘ममी’ मंगोलियात आढळून आली असून या बौद्ध भिख्खूची ममी अजूनही ध्यानधारणेला बसलेल्या ‘लोटस’ स्थितीत आहे.

याबाबत पुरातन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २०० वर्षांपूर्वीची ही ममी असावी. प्राण्यांच्या कातड्यात या बौद्ध भिख्खूचे शरीर याच अवस्थेत गुंडाळून ठेवण्यात आले असावे, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

mummy1

‘द सायबेरियन टाईम्स’च्या म्हणण्यानुसार, लोटस स्थितीत मन:शांतिसाठी बसलेल्या या व्यक्तीचे शरीर अजूनही ध्यानधारणा करते असे भासते. ही ममी लामा दाशी – डोर्झो इटीगिलोव्ह यांच्या गुरुंची असावी, असा तर्क आता लावण्यात येतो आहे. १८५२ मध्ये लामा दाशी यांचा जन्म झाला होता.

२७ जानेवारी रोजी ही ममी मंगोलियाच्या सॉंगिनोखैरखान येथे आढळून आल्यानंतर, या ‘ममी’ला पुढच्या फॉरेन्सिक टेस्टसाठी राजधानी उलानबतारकडे पाठवण्यात आली आहे.

Leave a Comment