अखेर शाओमीचा एमआय ४ भारतात लाँच

mi4
मुंबई: आज भारतात शाओमीचा बहुप्रतीक्षित एमआय ४ लाँच झाल्यामुळे स्मार्टफोन युजर्ससाठी एक पर्वणी ठरणार आहे. आजपासून फ्लिपकार्टवर एमआय ४साठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली असून १० फेब्रुवारीपासून विक्रीला सुरुवात होईल.

शाओमी एमआय ४ ची किंमत १९ हजार ९९९ रुपये असल्यामुळे वीस हजाराच्या घरातील स्मार्टफोन्सना तगडी टक्कर मिळणार आहे. एमआय ४ मध्ये २.५ गीगा हर्ट्झ क्वॉलकॉम स्नॅप ड्रॅगन ८०१ प्रोसेसर असून ३ जीबीचा रॅम आहे. १६ जीबी इनबिल्ट मेमरी असून ६४ जीबी एक्स्पांडेबल मेमरी आहे. पाच इंचांचा फुल एचडी डिस्प्ले हे फोनचे वैशिष्ट्य मानावे लागेल. एमआय ४ ला फ्रंट कॅमेरा आहे, तर यात ४.४.३ किटकॅट व्हर्जन असणार आहे.

काहीच दिवसांपूर्वी शाओमीने एमआय ३ भारतात लाँच केला होता. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारताबाहेर एमआय ४ लाँच झाला होता, मात्र भारतीय ग्राहकांसाठी आता उपलब्ध झाला आहे.

Leave a Comment