सॅमसंगचा आगामी गॅलेक्सी सिक्स असेल अतिवेगवान

galaxy-6
सॅमसंग या कोरियन कंपनीचा बहुचर्चित सॅमसंग गॅलेक्सी एस सिक्स त्यांच्यापूर्वीच्या फोनपेक्षा ५० टक्के अधिक वेगवान असेल असे सांगितले जात आहे.या स्मार्टफोनसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरचा वापर केला गेल्यामुळे हा फोन वेगवान होणार आहे. हा प्रोसेसर एलजीच्या फोनमध्येही होता आणि तो अधिक तापत असल्याचे लक्षात आले होते. मात्र सॅमसंगने ही त्रुटी दूर करून हा प्रोसेसर एस सिक्समध्ये घेतला असल्याचेही समजते.

बार्सिलोना येथे २ ते ६ मार्च दरम्यान भरणार्‍या मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये हा फोन सादर केला जाणार असल्याची बातमी आहे. त्यापूर्वी कंपनी एक इव्हेंट करणार आहे. मोबाईल कॉन्फरन्समध्येच कंपनीने आपले एस फाईव्ह आणि एस फोर स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी सादर केले होते. नवीन एस सिक्ससाठी एज टू एज स्क्रीन, मेटॅलीक बॉडी, कर्व्हड डिस्प्ले असेल तसेच हा फोन अधिक सडपातळही असेल. मल्टीटास्कींगसाठी अति महत्वाची असलेली ३ किवा ४ जीबी रॅम, २० एमपीचा रियर कॅमेरा, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३२,६४.१२८ जीबी स्टोरेज, कॅमेरा हलला तरी स्थिर फोटो येण्यासाठी सेन्सर अशी त्याची अन्य वैशिष्ठ्ये असतील असाही अंदाज वर्तविला जात आहे.

हा फोन १० मिनिटे चार्ज केला तर चार तासांचा टॉकटाईम युजरला मिळू शकणार आहे तसेच याला वायरलेस चार्जिंगची सुविधाही दिली जाणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी एलटीई ऑप्शन सुविधाही दिली जाईल असेही समजते.

Leave a Comment