भारत दौऱ्यामुळे ओबामांच्या आयुष्यात घट

obama1
नवी दिल्ली : सध्या आपल्या देशात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याचे कौतुक सुरु असून मात्र अमेरिकन मीडियाने भारत दौऱ्यामुळे ओबामांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचा अजब दावा केला आहे.

अमेरिकन मीडियाने दिल्लीमधल्या वायू प्रदूषणाचा उल्लेख करत हा रिपोर्ट प्रसिद्ध केला असून दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी अधिक असल्याने ओबामांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यात म्हटले आहे. दिल्लीतल्या वायू प्रदूषणाबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांनी ओबामांचा दौरा सुरु होण्याआधीच चिंता व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाकडून त्यासाठी तब्बल १८०० एअर प्युरिफायर्सही खरेदी करण्यात आले होते.

ओबामांचे आयुष्यातले दिवसाला दोन म्हणजे एकूण सहा तास दिल्लीतील प्रदूषणामुळे कमी झाले. शिवाय ओबामांच्या आरोग्याला एका दिवसांत ८ सिगरेट्स पिऊन जेवढी हानी होत नाही, तेवढी दिल्लीतील प्रदूषणामुळे झाली, असे कँब्रिज विद्यापीठातील प्रदूषण विषयातील तज्ज्ञ डेव्हिड स्पीगलहॅल्टर यांचे मत आहे.

Leave a Comment