फेसबुकने वर्षभरात दिल्या ४५ लाख नोक-या

facebook
न्यूयॉर्क : गेल्या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत २२७ अब्ज डॉलरचे (सुमारे १४ लाख कोटी) योगदान जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने दिले असून याशिवाय ४५ लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या नोक-या दिल्या आहेत.

फेसबुक्स ग्लोबल इकॉनॉमिक इम्पॅक्ट नावाने डेलियाने अहवाल जारी केला असून यात म्हटले आहे की, फेसबुकचे मार्केटींग, प्लॅटफॉर्म व कनेक्टिव्हिटीने जगभरातील लोकांना नोकया देण्यास मदत झाली. फेसबुकचे सध्या १.३ अब्ज यूजर्स आहेत. प्रत्येक क्षेत्रात फेसबुकचा वापर वाढत आहे. त्यामुळे नोक-या उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे प्रमाण व व्यवसायदेखील वाढत आहे.

Leave a Comment