आजीबाईंनी दिला जुळ्यांना जन्म

twins
लखनऊ : आई होणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते पण काही वेळ आणि वय असते. नुकताच जगासमोर याला एक अपवाद आला आहे. एका महिलेने वयाच्या ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म देण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबतचे वृत्त डेली मेलने दिले असून त्यांच्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील उत्तर भागात असलेल्या एका गावातील ओमकारी सिंह या महिलेने ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला असून आतापर्यंत कोणत्याही वयोवृद्ध महिलेने या वयात मुलांना जन्म देण्याचा कोणतीही माहिती नसल्यामुळे हा एक विक्रमच आहे.

जुळे मुले जन्माला आली तेव्हा ओमकारी यांनी त्यांचे नाव आकाशवाणी आणि दुसऱ्या मुलाचे नाव बरसात ठेवले. पण दुर्दैवाने जन्मानंतर काही दिवसांत ओमकारी यांच्या दुसरा मुलगा ‘बरसात’चा मृत्यू झाला. त्यानंतर आकाशवाणीच या दाम्पत्यांचे जीवन बनले. यात विशेष म्हणजे ओमकारी सिंह यांचे पती चरण यांना आपल्या मुलाचे लग्न होतांना पाहायचे आहे. ते जास्त जास्त वेळ आपल्या मुलासोबत घालवतात.

Leave a Comment