मायक्रोसॉफ्ट विंडोज १० वर्षभरासाठी मोफत

windows
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या इतिहासात प्रथमच विंडोज अपग्रेडेशन सुविधा वर्षभरासाठी का होईना पण मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विंडोज ७, विंडोज ८.१ चे अपग्रेडेशन विंडोज १० मध्ये मोफत करून घेण्याची सुविधा कंपनीने या सॉफ्टवेअर युजरना दिली आहे. ही सुविधा वर्षभरासाठी असली तरी ती लॅपर्टाप, डेस्कटॉपबरोबरच विडोज स्मार्टफोनसाठीही दिली जाणार आहे. विंडोज १० लवकरच बाजारात दाखल होत आहेत.

कंपनीचे अधिकारी टेरी मेयरसन या संदर्भात माहिती देताना म्हणाले आजपर्यंत युजरला एक वेळाच मोठी रक्कम भरून विंडोज सिस्टीम खरेदी करावी लागत होती मात्र आता सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये विंडोज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युजरवरील खर्चाचा भार कमी होणार आहे. कंपनीच्या नितीत बदल होत असल्याचा हा पुरावा आहे.

Leave a Comment