रॅबिट टेलसह येतोय ऑप्पोचा यू ३ फॅब्लेट

appo
चीनी कंपनी ऑप्पो ने चीनसाठी ऑप्पो यू ३ फॅब्लेट लवकरच सादर केला जात असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आप्पो मिरर आणि ऑप्पो आर वन सी लाँच केल्यानंतर आठवड्याभरातच या फॅब्लेटची घोषणा केली गेली आहे.

या फॅब्लेटला रियर कव्हरवर पांढरी शुभ्र फर लावली गेली असून त्यामुळे अगदी सशाच्या शेपटीचा भास होतो आहे. ही रॅबिट टेलच या फॅब्लेटचे खास आकर्षण ठरते आहे. या फॅब्लेटसाठी ५.९ इंची डिस्प्ले, ५ एमपीचा फ्रंट तर १३ एमपीचा रियर कॅमेरा सोनी आयएमएक्स १४ सेन्सरसह देण्यात आला आहे. म्युझिक लव्हर्ससाठी ऑडिओ चीप, अँड्राईड किटकॅट ४.४.४, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी फिचर्स दिली गेली आहेत. याची बॅटरी अर्ध्या तासात ७५ टक्कयांपर्यंत चार्ज होऊ शकणार आहे. फॅब्लेटची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Comment