
बायकोला सरप्राईज द्यावे असे अनेकदा नवर्यांना का वाटते कोण जाणे? अमेरिकेच्या कोर्ट ब्राग फियाटव्हीले या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील गावात असाच एक सैनिक बायकोला सरप्राईज द्यायला गेला आणि त्याला चकक रूग्णालयात दाखल करावे लागले.
बायकोला सरप्राईज द्यायला गेला, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला
झाले असे की झिया नावाचे हे महाशय सकाळी लवकर उठून कामावर गेले. पण मध्येच त्यांच्या मनात अंथरूणात लोळत पडलेल्या बायकोला म्हणजे टिफिनीला ब्रेकफास्ट तयार करून सरप्राईज द्यावे असा विचार आला आणि तो घरी परतला. गुपचूप घरात शिरताना बायकोने सुरू केलेला सुरक्षा अलार्म वाजला. झोपलेली बायको एकदम सावध झाली आणि तिने चक्क बंदुकच हातात घेतली. घरात शिरणार्या आकृतीच्या सावलीचा नेम धरून तिने गोळी झाडली पण गोळीने नवर्याच्या छातीचाच वेध घेतला.
गोळी लागताच झिया ओरडला. बायकोलाही आवाज ओळखीचा वाटल्याने तीही आश्चर्यचकीत झाली. झियाला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत उत्तम आहे. या भागात वारंवार घरफोडीचा घटना घडत असल्याने नवरा कामावर गेल्यावर बायकोने सुरक्षा अलार्म लावला होता आणि त्यानेच झियाचा घात केला. घटना योगायोगाने घडली असली तरी पोलिस यामागे अन्य कांही कारण नाही ना याचा तपास करत आहेत.
