सॅमसंगचा पहिला टायझेन स्मार्टफोन झेड १ लॉन्च !

samsung
नवी दिल्ली : कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगने आज बहुचर्चित टायझेन ऑपरेटिंग सिस्टम असलेला स्मार्टफोन दिल्लीत एका मोठ्या दिमाखदार सोहळ्यात लॉन्च केला आहे.

अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्समध्ये टायझेन स्मार्टफोनबाबत चर्चा होती आणि याबद्दल अनेक अंदाजही बांधले जात होते. भारतात स्मार्टफोन्सचे मार्केट सतत वाढत आहे. यूजर्स आपले डिव्हाइस व्हिडिओ, टिव्ही प्रोग्रॅम्स, व्हिडिओ गेम्स आणि अनेक अॅप्ससाठी यूज करत असल्याचे सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे प्रेसिडंट आणि सीईओ ह्यून चिल हाँग यांनी सांगितले.

मोबाईलवर लाइव्ह टिव्हीची सर्व्हिस देणारी कंपनी नेक्स्जी टीव्ही आणि बॉक्स टीव्ही सोबत एक खास डील सॅमसंगने या टायझेन स्मार्टफोनसाठी केली असून या डीलनंतर युझर ७०००हून अधिक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट देखील स्मार्टफोनवर पाहू शकतील. यासाठी आपल्याला १७५० रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. त्याचबरोबर चित्रपट वर्तुळाच्या बातम्या देणाऱ्या हंगामा.कॉम सोबतही सॅमसंगने एक डील केल्यामुळे आपण म्यूझिक स्ट्रीमिंग आणि डाउनलोड पण करू शकता.

सॅमसंगने टायझेन ऑपरेटिंग सिस्टम असलेला स्मार्टफोन गूगलच्या ‘अँड्रॉइड वन’ला टक्कर देण्याच्या इराद्याने लॉन्च केला आहे. भारताच्या बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग टायझेन ऑपरेटिंग सिस्टमच्या द्वारे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment