गुगलची फ्लाईट सर्च सेवा भारतात उपलब्ध

google-flight
गुगलने त्यांची फ्लाईट सर्च सेवा भारतात लाँच केली आहे. यामुळे भारतातील नागरिकही विविध विमानोड्डाणांची माहिती मिळवून आपल्याला हवी तशी विमान तिकीटे बुकही करू शकणार आहेत. ही सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर २०११ सालीच लाँच केली गेली होती. ती आता भारतातही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सेवा डेस्कटॉप, स्मार्टफोन अथवा टॅब्लेटवरही मिळणार आहे. ही सेवा मिळविण्याची पद्धत अतिशय सुलभ आहे. लिंक ओपन केल्यानंतर प्रवाशांना ज्या फ्लाईटचा सर्च घ्यायचा असेल त्या फ्लाईटसंबंधीची सर्व माहिती, तिकीट दर, फ्लाईटची वेळ संबंधित विशेष पेजवर दिसणार आहे. प्रवासी तिकीटाचे बुकींगही करू शकणार आहेत. मल्टी सिटी प्रवासासाठी तसेच रिटर्न तिकीटासाठीही हे बुकींग करता येणार आहे. विशेष म्हणजे येथे महिनाभरातील संबंधित कंपनीचे तिकीट दर किती असतील याचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी आपल्या बजेटनुसार तिकीटे बुक करू शकणार आहेत.