
इंटेलचे असे डोंगल तयार केले आहे ज्यामुळे आपला रोजचा वापरातला टिव्ही एका मिनिटात पॉवरफुल संगणकात बदलू शकणार आहे. इंटेल कॉम्प्युट स्टीक असे या डोंगलचे नामकरण करण्यात आले असून ते विंडोज ८.१ अथवा लायनक्स प्री इन्स्टॉल केलेल्या स्वरूपात मिळणार आहे.
इंटेलचे डोंगल बनवेल टिव्हीचा कॉम्प्युटर
चार इंची लांब असलेल्या या डोंगलमध्ये इन्टेल प्रोसेसर, इन बिल्ट वायरलेस कनेक्टीव्हीटी, ऑन बोर्ड स्टोरेज व अॅडीशनल स्टोरेज साठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट सुविधा उपलब्ध आहे. याच वर्षात हे डोंगल लाँच केले जाणार असून विडोज ८.१ मध्ये ३२ जीबी स्टोरेज आहे. याची किंमत आहे १४९ डॉलर्स म्हणजे साधारण ९३१५ रूपये. लायनेक्स व्हर्जन ८९ डॉलर्स म्हणजे ५५६५ रूपयांत उपलब्ध होणार आहे. त्याची स्टोरेज आहे ८ जीबी.
