यूजीसीचा ऐतिहासिक निर्णय; विद्यापीठांमध्ये श्रेणीपद्धत बंधनकारक

ugc
नवी दिल्ली – नवीन वर्षांत एक आनंदाची बातमी देशभरातल्या विद्यापिठांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असून आता लवकरच विद्यापीठांमध्ये गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीने २०१५-१६ या शैषणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये श्रेणी पद्धत बंधनकारक केली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रमही निवडता येणार आहेत.

यात काही विषय अनिवार्य तर काही ऐच्छिक असणार आहेत. या शिवाय सेमिस्टर पॅटर्न राबविण्याचेही विद्यापीठांना आदेश दिले आहेत. त्यामुळे याचा फायदा देशभरातल्या ४०० विद्यापीठातल्या लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे, असे यूजीसीनं म्हटलं आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा निर्माण करून विद्यापीठांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी यूजीसीने पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्‌यात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नुकत्याच झालेल्या बैठकीत या नव्या पद्धतीबाबत चर्चा करून त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर टक्क्यांऐवजी आता श्रेणी दिसणार आहेत.

Leave a Comment