किम जोंग उंग ब्रिटनमध्ये रेस्टॉरंट खोलणार

koria
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उंग ब्रिटनमध्ये नवीन रेस्टॉरंट खोलण्याच्या तयारीत असून हे रेस्टॉरंट स्कॉटलंडमध्ये उघडण्यास त्याने प्राधान्य दिले असल्याचे सांगितले जात आहे. रेस्टॉरंटसाठी जागा शोधण्याची मोहिैम सुरू करण्यात आली आहे मात्र स्कॉटलंडला अधिक प्राधान्य देण्यामागचे कारण किम जोंगला तेथील व्हिस्की अतिशय प्रिय आहे असे सांगितले जात आहे.

उत्तर कोरियन सरकारतर्फे ही रेस्टॉरंट चेन चालविली जाते. त्यांच्या चीन आणि अन्य आशियाई देशात शाखा आहेत. ब्रिटनमध्ये हे रेस्टॉरंट सुरू झाले तर युरोपीय देशातील ती दुसरी शाखा असेल. त्याचे एक रेस्टॉरंट अॅमस्टरडॅम येथे सुरू आहे. या रेस्टॉरंटमधून होत असलेल्या कमाईच्या ३० टक्के रक्कम प्योंगयांगला पाठविली जाते असे सांगितले जात असले तरी कांही जणांच्या मते हा सारा पैसा किमच्या चैनीसाठी वापरला जातो.

ब्रिटनमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यामागे उत्तर कोरियाला युरोपबरोबरचे राजनितीक संबंध अधिक वाढविण्याची इच्छा असल्याचे कारण दिले जात आहे. त्यातही वामपंथी देशांना त्यांचे अधिक प्राधान्य आहे. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परदेशी चलनाचा साठा वाढविण्याचा हा कोरियन सरकारचा कायेदेशीर मार्ग असून ही सरकारची ही गोपनीय शाखा आहे. या रेस्टॉरंटमध्ये कोल्ड नूडल्स, माशांचे विविध प्रकार, शाकाहारी पदार्थ तसेच कुत्र्याच्या मासाचे सूप असे लोकप्रिय कोरियन पदार्थ दिले जाणार आहेत.

Leave a Comment