वर्षा अखेरीस सेन्सेक्समध्ये ३१ अंकांची वाढ

share-market
मुंबई – वर्षाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजारात बुधवारी सकाळी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्सने ३१ अंकांची वाढ नोंदवली. या वाढीसह सध्या २७,४३४ बीएसई सेन्सेक्स अंकांवर आहे. धातू, बांधकाम, बँकिंग, आरोग्य, तेल आणि नैसर्गिक वायूच्या शेअर्समध्ये तेजी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही १४ अंकांची वाढ झाली असून, निफ्टी सध्या ८,२६२ अंकांवर आहे.

आयसीआयसीआय बँक, टीसीएस, हिंडाल्को, टाटा पॉवर, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे सेन्सेक्समध्ये वधारणा झाली आहे. महिंद्रा अँण्ड महिंद्रा, बजाज ऑटो, मारुती सुझूकी इंडिया आणि हिरो मोटो कॉर्प या वाहन उद्योगातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Leave a Comment