शास्त्रींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे धोनीने दिला राजीनामा !

combo
नवी दिल्ली : टीम इंडियाचा धुरंधर याने काल केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विविध चर्चेला उधाण आले होते. पण आता महेंद्रसिंह धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीचे कारण समोर आले असून धोनीने टीमच्या निर्णयात रवी शास्त्री यांचा हस्तक्षेप अधिक वाढल्यामुळे अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला.

शास्त्री कुठल्याही निर्णय घेते वेळी धोनीऐवजी विराटला अधिक पसंती देत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली अर्थातच अॅडलेड टेस्ट संपल्यानंतर विराट कोहलीला कर्णधार करण्यासाठी शास्त्रीनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती.

विराट कोहलीने अॅडलेडमध्ये भारताचे कर्णधार पद स्वीकारले होते आणि भारत मॅच ही जिंकणार असे वाटत होते. मात्र टीम इंडियाला ही मॅच गमवावी लागली होती. सुत्रांच्या माहितीनुसार रवी शास्त्रींना ज्यावेळी टीमचे व्यवस्थापक केले गेले त्यावेळीपासूनच भारतीय टीममधील वातावरण खराब झाले होते.

Leave a Comment