
सिडनी – ऑस्ट्रेलियन संघात डावखुरा फिरकी गोलंदाज एश्टन एगरची भारताविरुध्द होणा-या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली असून चौथ्या कसोटी सामन्याला सहा जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरुवात होणार आहे. एगरची संघातील निवड आश्चर्यकारक मानली जात असून सिडनीच्या खेळपट्टीने नेहमीच फिरकी गोलंदाजांना साथ दिली आहे. ही बाब ध्यानात घेऊन ऑस्ट्रेलियन संघात एगरचा समावेश करण्यात आला आहे.
एश्टन एगरची चौथ्या कसोटीसाठी निवड
मागच्यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एगरने संस्मरणीय पदार्पण केले. त्याने अकराव्या स्थानावर फलंदाजी करताना ९८ धावा केल्या होत्या. भारताविरुध्दच्या चौथ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये समावेश होईल याची खात्री नसल्याचे अॅगरने सांगितले.
