वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान छेत्रीला

sunil-chetri
मुंबई : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान देत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला गौरवले आहे. चार वर्षात तिस-यांदा सुनीलने हा पुरस्कार पटकावला आहे. तर बाला देवीला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार दिला आहे.

नुकत्याच झालेल्या आयएसएल लीगमध्ये केरळ ब्लास्टर्सकडून खेळणा-या संदेश झिगनला वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. मागील महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झालेल्या सॅफ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १६ गोल नोंदवणा-या २४ वर्षीय बाला देवीला रोख रक्कम १ लाख व चषक देऊन गौरवण्यात आले. आपल्या कारकिर्दीत चार वर्षात तिस-यांदा हा पुरस्कार पटकावणा-या सुनील छेत्रीला एआयएफएफने रोख रक्कम २ लाख व चषक देऊन सन्मानित केले.

Leave a Comment