तुरुंगातच राहणार लख्वी

zakiur-lakhvi
इस्लामाबाद : २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लख्वीला भारताच्या तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा अटक केली असून लख्वीला सहा वर्षापूर्वीच्या अपहरण प्रकरणी पुन्हा एकदा तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने झकीउर रहमान लख्वीला कालच तुरुंगात ठेवण्याची पाकिस्तान सरकारची अधिसूचना रद्द केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा तुरुंगाच्या बाहेर लख्वी पडणार होता. त्यासाठी त्याने दहा लाख रुपयेही न्यायालयाकडे सुपुर्द केले होते.

भारताच्या आक्षेपामुळे पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा आज लख्वी तुरुंगाबाहेर येणार असे वाटत असतानाच त्याच्यावरील अपहरणाचे प्रकरण उकरून काढत त्याचा तुरुंगातील मुक्काम कायम ठेवला आहे.

Leave a Comment