अनेक बँक खात्यांसाठी एकच ई-पासबुक

online
मुंबई – आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना एकापेक्षा अधिक बँक खाती असणार्‍यांना यापुढे या खात्यांवर लक्ष ठेवणे किंवा व्यवहार करणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्यामुळे इच्छुक खातेधारकांना सर्व बँक खात्यांसाठी लवकरच एकच ई-पासबुक मिळणार आहे.

ही योजना कार्यान्वित झाली तर, आवश्यक असल्याशिवाय बँकेत जाण्याची गरज भासणार नाही किंवा दोन-चार खात्यांचे इंटरनेट युझर आयडी आणि पासवर्डही लक्षात ठेवावे लागणार नाही. २०१५ मध्ये मार्चपूर्वी ही वेबसाईट प्रत्यक्षात येणार असून, त्यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील, असे मानले जात आहे.

काही खाजगी बँकांनी नुकतीच ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली असून रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एका अभिनव वेबसाईटची निर्मिती सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकाला या वेबसाईटवरून अकाऊंटमधील बॅलन्स तपासणे, बिल भरणा करणे किंवा एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे जमा करणे, अशा प्राथमिक सुविधा देण्यात येतील.

Leave a Comment