लख्वीला तुरुंगात ठेवण्याचा निर्णय रद्द

zakiur-lakhvi
इस्लामाबाद – सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या झाकीउर रहमान लख्वीला तुरुंगात ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय रद्द केल्यामुळे आता लख्वीची तुरुंगातून सुटका होणार आहे.

लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर दुस-याच दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी असणा-या तरतुदीअंतर्गत पाकिस्तान सरकारने लख्वीला तीन महिन्यांसाठी तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर लाख्वीने या निर्णयाविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान लख्वीला तुरुंगात ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्याने लाख्वीचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment