ऑस्ट्रेलियाकडे भक्कम आघाडी

cricket
मेलबर्न – ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर तिस-या कसोटी सामन्यातील दुस-या डावात ३२६ धावांची भक्कम आघाडी मिळवली असून दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सात बाद २६१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे शॉन मार्श(६२) आणि ख्रिस रॉजर्स(८) खेळपट्टीवर तळ ठोकून आहेत.

भारताचा डाव तिस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी ४६५ धावांवर आटोपला. तिस-या दिवसाच्या आठ बाद ४६२ धावसंख्येवरुन डावाची सुरवात केल्यानंतर भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताचे तळाचे दोन फलंदाज केवळ तीन धावांत तंबूत परतले. तिस-या दिवशी मधल्या फळीतील विराट कोहली आणि अजिंक्य राहणे या जोडगोळीने धमाकेदार कामगिरी करत भारताला साडेचारशेहून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला होता.

विराटने दीड शतक तर रहाणेने शतकी खेळी करत २६१ धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे ५३० धावांचे डोंगराएवढे आव्हानही खुजे वाटू लागले होते. मात्र विराट, रहाणे बाद झाले आणि परिस्थिती पूर्णपणे पालटली. हे दोनही खेळाडू बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीचे प्रदर्शन पुन्हा घडवले आणि तिस-य़ा दिवसअखेर भारताने आठ बाद ४६२ अशी मजल मारली. भारताकडे तिस-या दिवसअखेर ६८ धावांची पिछाडी होती.

Leave a Comment