गुंतवणूकीला बाधक नियम हटवणे आवश्यक – अर्थमंत्री

arun
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाच्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुंतवणूकी बाधित करणारे नियम हटवणे आवश्यक असून, जागतिक कर व्यवस्थेनुसार कर प्रणाली असली पाहिजे तर जास्तीत जास्त गुंतवणूक येईल आणि विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले.

उत्पादन क्षेत्राच्या विकासाची गती सध्या कमी असून या क्षेत्राचा क्षमतेनुसार विकास होत नाही आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी तात्काळ काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या निर्णयांचे परिणाम एकारात्रीत दिसणार नाहीत त्यासाठी वेळ द्यावा लागेल असे जेटली यांनी सांगितले. दोन वर्षांच्या मंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये थोडी प्रगती दिसून येईल. पुढच्या तिमाहीतील निकाल अधिक चांगले असतील असे जेटली म्हणाले.

Leave a Comment