पिंपरी- चिंचवडचे नाव न्यू पुणे करण्याची सूचना

pcmc
पुणे – पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प आणायचे असतील, तर पिंपरी-चिंचवडचे नाव बदलून न्यू पुणे‘ करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकार ठेवणार असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय नगरविकास विभागाकडे अशी सूचना प्राथमिक तत्त्वावर सचिव दर्जाच्या अनेक अधिकार्‍यांनी केली आहे. आता या मुद्द्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सदस्यांनी एकमताने सहमती द्यावी, असे नगरविकास विभागाचे मत आहे. हिंजवडी इन्फोटेक पार्क, तसेच मोशी येथील प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि खेड येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पिंपरी-चिंचवड शहराला नवी ओळख प्राप्त होत आहे. अशाच प्रकारचे आणखी काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये आणायचे असतील, तर शहराला पिंपरी-चिंचवड ऐवजी न्यू पुणे‘ असे म्हणावे, असे मत व्यापार, नगरविकास, मनुष्यबळ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील काही अधिकार्‍यांनी बोलताना व्यक्त केले.

Leave a Comment