टेकड्या फोडून हजारो बेकायदा बांधकामे पुणे शहरात उभी

construction
पुणे – पुणे महानगर पालिकेच्या हद्दीचा विस्तार होत असताना १४ गावांतील टेकड्या फोडून तब्बल सव्वा दोन हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली असून, ती करताना ऐंशीहून अधिक ठिकाणी विनापरवाना उत्खननही करण्यात आले आहे. अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि राजकीय आशीर्वादामुळे एका टेकडीला झोपडपट्टीचा विळखा पडला आहे. पुण्याची प्रादेशिक योजना १९९७मध्ये मंजूर झाली आहे. या योजनेनुसार टेकड्यांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. पर्यावरणदृष्ट्‌या टेकड्या महत्त्वाच्या असल्याने त्यावर बांधकामास निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि, महापालिकेत समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या हद्दीलगतच्या चौदा गावांतील टेकड्या बेकायदा बांधकामांनी भरल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment