एअर एशियाच्या विमानाचा संपर्क तुटला

air-asia
सिंगापूर – एअर एशियाचे विमान रविवारी सकाळी इंडोनेशियाहून सिंगापूरच्या दिशेने निघाले असता उड्डाणानंतर त्याचा अचानक संपर्क तुटला आहे. या विमानात १५५ प्रवाशांसह सात क्रू मेंबर आहेत.

सिंगापूरच्या दिशेने एअर एशियाचे क्यू झेड ८५०१ हे विमान जात होते. नियोजित वेळी उड्डाण केल्यानंतर सकाळी सात वाजून २४ मिनिटांच्या सुमारास विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. सकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी इंडोनेशियातील सुराबया येथून या विमानाचे उड्डाण झाले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंगापूरमधील चांगी विमानतळावर हे विमान उतरणार होते. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर ४२ मिनिटांनी विमानातील प्रवाशाचा संपर्क तुटला. या विमानात कोणीही भारतीय नागरिक नाही.

Leave a Comment