‘घुमान’साठी २ खास रेल्वेगाड्‌या

sahity-samelan
मुंबई – यंदा ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील ‘घुमान’ येथे होत असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दोन रेल्वे गाड्‌या सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

३ ते ५ एप्रिल २०१५ या दरम्यान घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यासाठी या रेल्वे गाड्‌याची सोय केली आहे. यापैकी एक नाशिकमधून तर दुसरी बांद्रा येथून सुटणार आहे. १ एप्रिल रोजी या गाड्‌या सुटणार असून ३ तारखेला सकाळी अमृतसर आणि उमरचांदा येथे पोहोचतील. त्यातील नाशिकहून जाणारी रेल्वे ही नागपूरमार्गे पुढे जाणार आहे. तर मुंबईतील बांद्रयाहून जाणारी गाडी पुणे, मनमाड आणि औरंगाबादमार्गे पंजाबकडे जाईल.

Leave a Comment